बॉर्दो
बॉर्दो : फ्रान्सच्या जिराँद प्रांताची राजधानी आणि देशातील महत्त्वाचे नदी बंदर. लोकसंख्या २,२६,२८१ (१९७५). हे गारॉन नदीतीरावर नदीमुखापासून ९६ किमी. आत, पॅरिसच्या नैर्ऋत्येस ५६० किमी. अंतरावर वसले आहे. लोहमार्ग, सडका, हवाई व जलवाहतूक यांचे हे केंद्र आहे.